सैनिक टाकळीतील गांजा प्रकरणी अटक केलेल्या शेतकऱ्याला पोलीस कोठडी…

0
255

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे ऊसाच्या शेतात गांजा पिकवणारा शेतकरी आप्पासाहेब सदाशिव कोळी याला आज (शुक्रवार) जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभे केले असता त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सैनिक टाकळी येथे गांजाच्या झाडांची शेती करून कर्नाटक राज्यात गांजाचा पुरवठा करत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी धाड टाकून हा गांजा जप्त करत सदाशिव कोळी या शेतकऱ्याला ताब्यात घेतेले होते. दरम्यान, पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून कर्नाटक राज्यासह सांगली-कोल्हापूरमध्ये याची पाळेमुळे रोवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.