नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. काल (रविवार) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बिरजू महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. त्यांनी कथ्थक बरोबरच हिंदी सिनेसृष्टीतील काही गाण्यांचे नृत्य दिग्दर्शनही केले होते.