मुंबई (प्रतिनिधी) : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज (बुधवार) निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. त्यांनी रामानंद सागर यांची अजरामर झालेली सिरीयल रामायणमध्ये राजा दशरथ यांचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारली होती.

चंद्रशेखर वैद्य यांचा जन्म १९३३ साली हैद्राबाद येथे झाला होता. वैद्य यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीमध्ये ११० हून अधिक चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये १९६४ साली आलेल्या ‘चा चा चा’ आणि १९६६ साली स्ट्रिट सिंगर या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते.