मुंबई (प्रतिनिधी) : सोने आणि चांदीच्या दरात आज (शनिवार) मोठी घसरण झाली. आज २२ कॅरट सोन्याचा दर प्रतितोळा ४७,७५० रुपये एवढा आहे. शुक्रवारी २२ कॅरट सोन्याचा दर ४८,१०० रुपये इतका होता. २२ कॅरट सोन्याचा दरात प्रतितोळामागे ३५० रुपयांची घसरण झाली आहे. तर २४ कॅरट सोन्याचा दर प्रतितोळामागे ३७० रुपयांनी घसरला आहे.

आज २४ कॅरट सोन्याचा दर प्रतितोळा ५२,१०० रुपये इतका आहे. शुक्रवारी हा दर ५२,४७० रुपये इतका होता. आज चांदीचा दर प्रतिकिलो ६१,७०० रुपये इतका आहे. चांदीच्या दारात आज किलोमागे तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.