घाटगेंच्या त्या उपोषणावरुन फडणवीसांचा सरकारला इशारा

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी): शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्या उपोषणाची दखल घ्या. अन्यथा या मोहिमेला मोठ्या आंदोलनाचे स्वरूप यायला वेळ लागणार नाही, असा गंभीर इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.

घाटगे यांचे शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी यासाठी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला फडणवीसांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, सरकारच्या मोघलाई विरोधात समरजितसिंह घाटगे यांचे आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. सरकारने घाटगे यांच्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा या मोहिमेला व्यापक स्वपरुप यायला वेळ लागणार नाही.