राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) येथे शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात आली. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच  लसीकरणही सुरू झाले आहे. परिणामी जिल्हा परिषद शाळेमार्फत शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलामुलींना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १ ते १० मार्च या कालावधीत गावोगावी ही शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

३ ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची सद्यस्थिती समजावी. तसेच गावाबाहेर वस्ती असलेल्या भटक्या जमातीमधील शाळाबाह्य मुलांची संख्या समजावी, यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. या सर्व्हेमध्ये प्रगणक म्हणून जे.ए. ओंकार, पी.व्ही. पाटील,   अंगणवाडी सेविका रेखा लाड आदीसह शिक्षक व अंगणवाडीतील सेविका सहभागी झाल्या आहेत.