थेट पाईपलाईन योजनेचे होणार बाह्य लेखापरीक्षण ; महापालिकेने दिले आदेश

0
176

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील घरफाळा घोटाळ्याच्या स्थानिक संस्था निधी संचालनालय मार्फत लेखापरिक्षणाच्या प्रस्तावानंतर आता थेट पाईपलाईन योजनेच्या कामकाजाचे बाह्य लेखापरिक्षण करण्याचे आदेश जीकेसी कंपनीला महापालिकेने दिले आहेत. याचे पत्र जलअभियंता यांनी कंपनीला दिले. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या निर्देशानुसार महापालिकेने आदेश काढले असून आमच्या मागणीला यश आल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले.

देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे की, घरफाळा घोटाळा, थेट पाईपलाईन योजनेतील दिरंगाई याबाबत वस्तुस्थिती समोर येऊन कारवाई व्हावी यासाठी आम आदमी पार्टीने बाह्य लेखापरिक्षणाची मागणी केली होती. महापालिकेने दिलेल्या आदेशामुळे आता याबाबत बऱ्याच बाबी समोर येणार असून ‘आप’ने केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे.