वन्यजीव गुन्हेगारी नियंत्रणच्या स्वयंसेवकपदी सत्वशील जगदाळेंना मुदतवाढ

0
222

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जयसिंगपूर येथील सत्वशील बापूसाहेब जगदाळे यांना वन्यजीव अपराध नियंत्रण कार्यालयाच्यावतीने स्वयंसेवक म्हणून पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथील वन्यजीव अपराध नियंत्रण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालक तिलोत्तमा वर्मा यांनी याबाबत नुकतेच पत्र पाठविले आहे.

संवेदनशीलता, सार्वजनिक शिक्षण, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी सक्रिय सहभाग आणि योगदान लक्षात घेऊन, वन्यजीव आणि त्यांच्या अवैध वाहतुकीविषयी माहिती संग्रहण करण्याच्यादृष्टीने ३१ मार्च २०२२ पर्यंत पुढील दोन वर्षांसाठी डब्ल्यूसीबी स्वयंसेवक म्हणून ही मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी २ सप्टेंबर २०२० पर्यंत ही मुदत होती. जगदाळे पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील ई-सामग्री विकास आणि नाविन्य उपक्रम शिक्षण विभागात सध्या कार्यक्रम समन्वयक पदावर कार्यरत आहेत. गेली २० वर्षे ते वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात काम करत आहेत.