बीएड, बीपीएड सीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ द्या : संजय पवार

0
40

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २०२१-१२ या शैक्षणिक वर्षात बीएड, बीपीएड च्या व्यावसाईक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ‘सीईटी’चे ऑनलाईन परीक्षेचे फॉर्म भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२१-१२ या शैक्षणिक वर्षात बीएड, बीपीएड च्या व्यावसाईक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी सीईटी परीक्षेचे फॉर्म भरून घेण्याची शेवटची तारीख ९ ऑगस्ट होती. परंतु कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महापुराची परिस्थिती होती. त्यामुळे इंटरनेट व्यवस्था बंद पडली होती. तसेच इतर अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही परीक्षांचे निकाल लागावयाचे होते. त्यामुळे या भागातील इच्छुक विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरू शकले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. तरी सीईटी परीक्षेचे फॉर्म भरून घेण्यास आणखी ८ दिवस मुदतवाढ देण्यात यावी.