‘खच्याक मामां’ची चटका लावणारी एक्झिट..! (व्हिडिओ)

0
496

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरी भाषा… अस्खलिखित मराठी…  त्याचबरोबर  इंग्रजीतून संवादफेक करून कोल्हापूरकरांना खळखळून हसवणारे संकपाळनगरमधील  लाडके व्यक्तिमत्व बाबुराव पाटोळे (खच्याक मामा) यांचे निधन चटका लावून गेले.  कोल्हापुरात  ते ‘खच्याक मामा’  म्हणून प्रसिद्ध होते. त्याच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियातून प्रसारीत झाल्यानंतर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. रांगड्या कोल्हापुरी भाषेतून समाजातील वास्तवावर त्यांचे भाष्य मनाला भावून जात होते. कोरोना काळात त्यांनी प्रबोधन करून सर्वसामान्यांमध्ये असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरकरांना त्यांची उणीव कायम भासेल. ….अलविदा खच्याक मामा..!