मुंबई (प्रतिनिधी) : एका २९ वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू झाल्याने सिनेवर्तुळात खळबळ उडाली आहे. डिस्नी प्लस सिरीज स्नोड्रॉपची स्टार किम मी-सू हिचे अचानक निधन झाले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.  येओ जंग-मिनची भूमिका करणारी ही अभिनेत्री २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘मेमरीज’ आणि ‘क्यूंगमी की दुनिया’ मधील तिच्या पात्रासाठी ओळखली जाते.  

एजन्सी लॅनस्केपने एका निवेदनात म्हटले आहे की, किम अचानक ५ जानेवारी रोजी आम्हाला सोडून गेली. कृपया खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवू नका. जेणे करून मृत अभिनेत्रीच्या कुटुंबियांना जास्त त्रास होणार नाही. किम मि-सूच्या कुटुंबीयांना तिचे अंतिम संस्कार शांतपणे आणि खासगीरित्या करायचे आहेत. किम यांच्या पार्थिवावर तानेयुंग सुंगसिम फ्युनरल होममध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.

किमचा जन्म १९९२ मध्ये दक्षिण कोरियामध्ये झाला होता. तिने लिपस्टिक रिव्होल्यूशन आणि हाय बाय, मामा या चित्रपटातही काम केले. किमची डिस्ने पल्स नाटक ‘किस सिक्स सेन्स’मध्ये अभिनय करण्यासाठी देखील निवड झाली होती.