कोरोना काळात पिंपळगाव आरोग्य केंद्राची उत्कृष्ट सेवा : अशोकराव पाटील 

0
87

पिंपळगाव (प्रतिनिधी) :  कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य लोकांना चांगली सेवा मिळत आहे.  आरोग्य केंद्राचे कामकाज समाधानकारक  सुरू आहे, असे  प्रतिपादन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अशोकराव पाटील यांनी केले.

पिंपळगाव (ता.भुदरगड) येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत परुळेकर  व पिंपळगावचे ग्रामसेवक रंगनाथ बोडके  यांची कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेवर बिनविरोध चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. नारायण शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. चंद्रकांत परुळेकर व ग्रामसेवक बोडके यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास नागनवाडी धरणग्रस्त कमिटीचे सचिव संतोष देशपांडे, सचिन कातकर, अंकुश पाटील, दशरथ तेलवेकर, अरुण खवरे, साताप्पा केसरकर, धनाजी पाटील, बाळासाहेब चव्हाण, बाबुराव राऊत, परशराम चव्हाण, नागेश घुरे, बाळासो बाबर, सुधीर शिंदे, सर्जेराव शिंदे, पप्पू उतुरे, राजू मगदूम, सुभाष खवरे आदी उपस्थित होते. आभार अंकुश पाटील यांनी मानले.