कोल्हापूर : जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना नवी दिल्लीतील केंद्रीय सैनिक बोर्डातर्फे प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

ज्या पाल्यांनी १२ वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळविले आहेत आणि त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी अधिक माहिती www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज ३० डिसेंबर २०२० पूर्वी करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी वि. बा. पाटील यांनी केले आहे.