…तर सेलिब्रिटींना कुत्रंसुद्धा विचारणार नाही : राजू शेट्टी (व्हिडिओ)

0
160

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मायबाप जनतेवर अवलंबून असलेले सेलिब्रिटी केंद्र सरकारची बाजू घेत आहे. परंतु देशातील जनता शेतकऱ्यांच्या बाजूने असून सेलिब्रिटींनी शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतल्यास त्यांचे तुंतुणे बंद पडायला वेळ लागणार नाही. मग त्यांना कोण कुत्रंसुद्धा विचारणार नाही, अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अमेरिकन पॅापस्टार रिहाना,  पॅार्नस्टार मिया खलिफा यांनी पाठिंबा दिला आहे. यावर काही सेलिब्रेटींनी बाहेरील व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नावर काही बोलू नये, असे म्हटले आहे.  या सेलिब्रिटींचा राजू शेट्टी यांनी खरपूस समाचार घेतला आहे.