ईडब्लूएसचा मराठा आरक्षणावर परिणाम नाही : अनिल परब

0
92

मुंबई (प्रतिनिधी) : ईडब्लूएस आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का ? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केला आहे. त्यावर सरकारकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. ईडब्लूएस आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे.

अनिल परब म्हणाले की, मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. या संघटनांनी एकत्र येवून निर्णय द्यायला हवा. ईडब्लूएसच्या मागणीसाठी काही विद्यार्थी कोर्टात जात आहेत म्हणून त्यांना ते द्यावे लागत आहे. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही, तर गरीब घटकांसाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पडत नसल्याचे ते म्हणाले.