मुंबई (प्रतिनिधी) : वीज बिलासंदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते, असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सरकारला इशारा दिला आहे.  

लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत सर्वसामान्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे ऊर्जा मंत्री घूमजाव करत हात झटकून देत आहे. राज्यातील जनतेला वीज बिलामध्ये कोणतीही सवलत अथवा माफी दिली जाणार नसल्याचे   ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे. यावर मनसेने    निशाणा साधला आहे.  मनसेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (गुरुवार) पक्षाची बैठक होणार आहे. तत्पूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत राज्य सरकारला  सावध केले आहे.