राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…: मनसेचा इशारा

0
138

मुंबई (प्रतिनिधी) : निकाल काहीही लागूदे, पण जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू,  असा इशारा मनसे कार्यकर्ते विनोद पाखरे यांनी  आज (शुक्रवारी) येथे  दिला आहे. राज ठाकरे  आज वाशी कोर्टात हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाशी टोलनाक्याजवळ जवळपास २ हजार कार्यकर्ते त्यांची प्रतीक्षा करत  आहेत. यावेळी हा इशारा देण्यात आला आहे.

२०१४ च्या वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी राज ठाकरे न्यायालयात उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आपण जाणार असल्याचे  पाखरे यांनी सांगितले आहे. याआधी कोर्टाने राज ठाकरे यांना दोन समन्स बजवाले होते. मात्र कोर्टात हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांना आता पुन्हा नोटिस बजावली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्यावर कितीही केसेस पडल्या तरी आम्ही राज ठाकरेंसोबत राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे वाशी टोलनाका तोडफोडीच्या प्रकरणाचा निकाल  काय लागतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.