इचलकरंजीतील उद्योजक बेपत्ता : पंचगंगा नदीघाट परिसरात दुचाकी आढळली

0
177

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील वर्धमाननगर परिसरात राहणारे प्रसिद्ध उद्योजक अमर श्रीधर डोंगरे बेपत्ता झाले आहेत. त्यांची दुचाकी पंचगंगा नदीघाट परिसरात आढळून आली. सोमवारी (दि.२१) रात्री उशिरापर्यंत नदी परिसरात त्यांचा शोध घेण्यात आला. परंतु ते आढळून आले नाहीत. याप्रकरणी त्यांचे  भाऊ मोहन श्रीधर डोंगरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमर सोमवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून घरातून निघून गेले होते. दुपारपर्यंत ते परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो झाला नाही. सायंकाळनंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी पंचगंगा नदीघाटावरील गणपती मंदिराजवळ त्यांची दुचाकी आढळली. त्यामुळे येथे पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. मात्र, ते आढळून आले नाहीत. अधिक तपास पोलीस करत आहेत.