नवी दिल्ली (प्रतिनिधी) : एका ड्राय फ्रूट घोटाळ्याप्रकरणी उद्योजक मोहीत गोयल आणि त्याच्या साथीदारांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. ड्राय फ्रूट बिजनेसच्या नावाखाली देशभरातील विविध शहरात २००  कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. अवघ्या २५१ रूपयांमध्ये जगाला स्मार्टफोनचे स्वप्न दाखवल्याने मोहित चर्चेत आला होता. आता त्याला  अटक झाल्याने  पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.  

उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश अशा  राज्यांतून जवळपास  ४० व्यापाऱ्यांनी गोयल विरोधात तक्रार केली होती. मोहित  देशभरातून सुका मेवा, डाळ, तेल, मसाले आदी खरेदी करून  व्यापारांना द्यायचा.   मोठमोठ्या ऑर्डर देऊन ४०  टक्के रक्कम नेट बँकिंगच्या माध्यमातून आगाऊ भरली जात असे. उर्वरित रक्कम चेकच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन देत होता.  मात्र, बँकेत धनादेश बाऊन्स व्हायचा.