कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कॅमेरा हॅन्डलिंग वर्कशॉपला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वरिष्ठ कॅमेरामन प्रशांत आयरेकर आणि रवींद्र बागल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठातील काही शिक्षक तसेच विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह अन्य हौशी कॅमेरामन या वर्कशॉपमध्ये सहभागी झाले होते. प्रारंभी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले. पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, सहयोगी शिक्षक डॉ. आलोक जत्राटकर, मोहसीन मुल्ला, मतीन शेख, अक्षय दळवी, चेतन गळगे आदी उपस्थित होते.
आयरेकर आणि बागल यांनी विद्यार्थ्यांना शटर स्पीड, अँपर्चर, आयएसओ आदी संदर्भात प्राथमिक माहिती दिली. कॅमेरा अँगल, झूम इन, झूम आऊट याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून ते आजच्या डिजिटल कॅमेरा प्रवासापर्यंत तपशीलवार माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. व्हिडिओग्राफी, व्हिडिओ अँगल, बॉडी लँग्वेज याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना काही टिप्स दिल्या.
विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अध्यासनाच्या बाहेर फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी केली. त्यानंतर मार्गदर्शकासह विद्यार्थ्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत फोटोग्राफीचे प्रात्यक्षिक केले. काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओग्राफी करून तज्ञांच्या मदतीने प्रात्यक्षिक केले.