शाहू महाविद्यालयात ‘हरित शपथ’ उपक्रम उत्साहात  

0
212

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने ‘हरितशपथ’ घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थी व शिक्षकांना महाविद्यालयाच्या प्रांगणात हरितशपथ देण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.टी.साळुंखे यांनी पर्यावरणाचे महत्व सांगितले. त्याचबरोबर ज्युनिअर कॉलेजच्या उपप्राचार्या प्रा.सौ.एन.एस.साळुंखे यांनी पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या घटकांची माहिती दिली.

महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.एस.एम.गोजारे यांनी  विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवक यांना सामूहिक हरितशपथ दिली. या कार्यक्रमामध्ये ४५ सेवक व ८२ विद्यार्थांनी सहभाग घेतला.

प्रा.डॉ. भाग्यश्री पुणतांबेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.ज्योती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रा.माधुरी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन प्रा.डॉ. बी.बी.घुरके, प्रा.भिलवडे, प्रा.सायरा मुलाणी आदीसह शिक्षकेत्तर सेवक यांनी केले.