इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्याचे प्रवेशद्वार मानल्या गेलेल्या आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचे गाव असलेल्या यड्राव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

आरोग्यमंत्री यड्रावकर यांनी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यास ५० लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. सध्या जि. प. सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. यड्रावकर गट व सतेंद्रराजे नाईक-निंबाळकर यांची युती या गावामध्ये आहे. शिवसेनेदेखील काही ठराविक प्रभागमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. या मुळे बिनविरोध करण्याच्या चर्चेला खो बसला आहे. माघार घेणार कोण आणि संधी कोणाला द्यायची यामध्ये नेत्यांची डोकेदुखी वाढत आहे.

उद्याचा (सोमवार दि. ४) दिवस हा उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अजूनही यड्रावकर गटाचे उमेदवार नक्की कोण आहेत, हे ठरलेले नाही. यामुळे उमेदवार व प्रभागातील नागरिकांमध्ये संभ्रमावस्था  त्यामुळेच यड्राव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.