इचलकरंजी येथे अतिक्रमण विभागाची जोरदार कारवाई…

0
84

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे अतिक्रमण विभागाने आज (शुक्रवार) जोरदार कारवाईचा बडगा उगारला आहे. यावेळी वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या ६ गाड्यांवर कारवाई केली. या गाड्या रस्त्याकडेला वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाकडे आल्या होत्या. त्याच अनुषंगाने तीन बत्ती चौक आणि उत्तम प्रकाश चित्रमदींरा जवळील १ गाडीवर कारवाई केली. यावेळी कांही वादाचे प्रसंगही घडले. ही कारवाई सुभाष आवळे यांच्या नेतृत्त्वाखाली अतिक्रमण पथकाने केली आहे.