सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वीज बील भरणा केंद्रे सुरु राहणार

0
13

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवार (दि. २९) आणि रविवारी (दि.३०) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत.

महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपव्दारे केंव्हाही व कुठूनही सर्व लघुदाब वीजग्राहकांना डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकीग, मोबाईल वॅलेट तसेच कॅश कार्डचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरता येते. वीज ग्राहक ‘आरटीजीएस’  किंवा ‘एनईएफटी’द्वारे ऑनलाईन वीज देयकाचा भरणा करु शकतात. तेंव्हा वीज ग्राहकांनी या प्रणालीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

डिजिटल बिल भरणा सूट

वीज ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरल्यास वीज बिल रक्कमेच्या ०.२५ टक्के डिजिटल बिल भरणा सूट महावितरणकडून वीज ग्राहकांना देण्यात येते. त्याचा तपशील मासिक वीज बिलावर देण्यात येतो.