मुंबई (प्रातिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत ढकलल्या आहेत. राज्य सरकरने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच पावसामुळे ८९ व्यक्तींचे निधन झाले आहे. राज्यात अतिवृष्टी असल्याने २४९ गावे बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.