यड्रावमध्ये शांततेत मतदानाला सुरूवात (व्हिडिओ)

0
396

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. या अनुषंगाने यड्रावमध्ये मतदान केंद्रावर   शाहपूर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

उमेदवारासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी बूथवर गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवत मतदारांच्या रांगा लावल्या. दरम्यान, मतदारांना आपली नावे शोधून काढताना मोठी धावपळ उडाली. त्यामुळे प्रत्येक बूथवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, कार्यकर्ते मतदान करण्यासाठी सर्व मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र दिसून आले.