जिल्हा परिषदेच्या विषय समितींच्या रिक्त पदांची निवडणूक बिनविरोध…

0
33

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ९ विषय समितींच्या १४ रिक्त पंदाची आज (मंगळवार) सर्वसाधारण सभेत १४ पैकी १४ उमेदवारांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. अशी घोषणा जि.प. अध्यक्ष राहूल पाटील यांनी केली.

यामध्ये स्थायी समिती पदी बंजरग पाटील आणि सतीश पाटील, आरोग्य समिती पदी हंबीरराव पाटील आणि सोनाली पाटील, समाज कल्याण समिती पदी स्वाती सासणे, शिक्षण व महिला बाल कल्याण समिती पदी पद्माराणी पाटील आणि आक्काताई नलवडे, अर्थ समिती प्रविण यादव आणि दिपाली परीट, शिक्षण समिती अरुण सुतार, कृषी समिती मंगल पाटील, पशुसंवर्धन व दुग्धसमिती वैशाली पाटील आणि रमेश तोडकर आणि बांधकाम समिती शिल्पा पाटील यांचा समावेश आहे.