‘गोकुळ’ची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ; निवडणूक होणारच

0
645

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ (गोकुळ) ची निवडणूक स्थगित करावी या बाबतची गोकुळ प्रशासनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली त्यामुळे गोकुळची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोकुळच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोरोना मुळे राज्यातील अनेक सहकारी संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या पण गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरूच ठेवली. गोकुळ प्रशासनाने ही निवडणुक घेऊ नये यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली त्यामुळे गोकुळची निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि तक्रारीवरील निर्गतीचे काम पूर्ण झाले असून अंतिम मतदार यादीही आज प्रसिद्धी करण्यात आली आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणुकीची प्रक्रिया सुरु होणार आहे.