आजरा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध…

0
343

आजरा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. आजरा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामध्ये होनेवाडी, गवसे, खोराटवाडी, एंरडोळ, पेद्रेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

आजरा तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी लढत होणार आहे. यामध्ये देवर्डे, सुळे, सिरसंगी, बेलवाडी, चिमणे, किणे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. महागोंड, मुमेवाडी, चव्हाणवाडी, जाधेवाडी, हालेवाडी, देवकांडगाव, हाळोली, दर्डेवाडी, मेढेवाडी, कासारकांडगाव, मुरुडे, निंगुडगे, सरोळी, कोवाडे, मलिग्रे, हात्तिवडे या ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत होणार आहे. वाटंगीत ग्रामपंचायतींमध्ये ५ जागा बिनविरोध तर ४ जागांसाठी निवडणूक होणार आहे.