आजरा नगरपंचायत समिती सभापतींच्या निवडी बिनविरोध

0
320

आजरा (प्रतिनिधी) : आजरा नगरपंचायतच्या विषय समितीच्या निवडी आज (सोमवार) बिनविरोध पार पडल्या. आजरा-भुदरगड उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या. शासनाचे कोरोना प्रतिबंध नियम असल्याने निवडी ऑनलाइन पद्धतीने झाल्या.

यामध्ये स्थायी समितीच्या सभापती म्हणून नगराध्यक्षा ज्योस्तना चराटी, पाणीपुरवठा व जलनिसारण सभापती अशोक चराटी, सार्वजनिक बांधकाम समिती सभापती किरण कांबळे, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अनिरुद्ध केसरकर, क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक समिती सभापती यास्मिन बुढेखान, नियोजन समिती सभापती सिकंदर दरवाजकर, महिला व बालकल्याण समिती सभापती यासिराबी लमतुरे, उपसभापती रेश्मा सोनेखान या पदाधिकारी यांच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीप्रसंगी नगरसेवक ऑनलाईन पध्दतीने सभेला हजर होते.