ब्राह्मण समाजाबाबतच्या विधानावर एकनाथ खडसेंचा माफीनामा..!  

0
102

मुंबई (प्रतिनिधी) : ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे.  माझ्या विधानाच्या झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी  ट्विट करत म्हटले आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यव्यावरुन माफी मागितली आहे.

खडसे यांनी म्हटले आहे की, ६ नोव्हेंबरला मी एका सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास करण्यात आला आहे.  ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असेही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.