Published September 24, 2020

मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करुन राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याच दरम्यान त्यांना काँग्रेस आणि शिवसेनेकडूनही पक्ष प्रवेशाची ऑफर आल्याचे समजते. त्यामुळे खडसे आता भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. यामुळे खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात शांतता पसरली आहे.

खडसेंच्या काँग्रेस प्रवेशावरुन राज्यस्तरावरून प्रस्ताव दिल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी सांगितले. तर शिवसेनेच्या नेत्याने मातोश्रीवरून निर्णय होईल, असे सांगून प्रश्नाला बगल दिली आहे. खडसे भाजपला रामराम करणार असल्याची काल जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, स्वतः खडसे यांनी याबद्दल काहीच माहिती नसल्याचे सांगितले होते. याबाबत आज मुक्ताईनगरात शांतता दिसत होती. दबक्या आवाजात जरी चर्चा सुरू असली खडसे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023