मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. आता डेल्टा कोरोना विषाणूमुळे मोठा धोका निर्माण झालाय. इंग्लंडमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकुळ घातलाय. भारतातसुद्धा आता तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकतर निर्बंध पुर्णतः हटवा किंवा संपूर्ण लॉकडाऊन कराव, अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टोपे म्हणाले की, भारतामध्ये आता दुसरी लाट ओसरत आली आहे. कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी घट बघायला मिळत आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची देखील शक्यता आहे. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाकडून तयारी देखील सुरू आहे. मात्र, बऱ्याच भागामध्ये लॉकडाऊन हाटवण्यात आले आहे. मात्र, काही निर्बंध कायम आहे. त्यासाठी एकतर निर्बध पूर्णत: हटवा, नाहीतर कडक लॉकडाऊन लावा, अशी मागणी राजेश टोपेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.