Published October 24, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी आज (शनिवार) करवीरनिवासिनी श्री अंबामातेची महापूजा ‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूपात बांधण्यात आली.

आज दुर्गामहाअष्टमी.  आजच्याच दिवशी श्री अंबामातेने विराट रूप धारण करून घनघोर युद्ध करीत महिषासुराचा वध केला. आपल्या प्रचंड शक्तीने मदोन्मत्त होऊन त्रैलोक्याला त्रास देणारा असुर आज संपला. ५१ शक्तिपिठांच्या यादीत करवीरसाठी येणारा ‘करवीरे महिषमर्दिनी’ असा उल्लेख दृग्गोचर करणारी अशी ही आजची पूजा…

ही पूजा श्रीपूजक प्रसाद लाटकर आणि श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023