कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज (बुधवार) काहीशी वाढ झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १८, ७४१ टेस्ट करण्यात आल्या असून पैकी १०६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचा जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ५.६६ टक्के आहे. दिवसभरात ११०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १५९, आजरा – ४५, भुदरगड – १४, चंदगड – १४, गडहिंग्लज – ५०, गगनबावडा – ०, हातकणंगले – १४०, कागल – १३२,  करवीर- १५९, पन्हाळा – ५१, राधानगरी – २९, शाहूवाडी – ४२, शिरोळ – ८०, नगरपरिषद क्षेत्र – , इतर जिल्हा व राज्यातील – २९ अशा १०६१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ८९, ९८३ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ७१, ५८०

मृतांची संख्या – ५, २८५

उपचार सुरू असलेले रुग्ण – १३, ११८