मुंबई : सलग आठ दिवसांच्या वाढीनंतर आज भारतीय शेअर बाजाराला ब्रेक लागला आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात नफा बुकिंग दिसून आले. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६३००० च्या खाली घसरला आहे. व्यवहार संपताना निर्देशांक ४१५ अंकांच्या घसरणीसह आज ६२,८६८ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९४ अंकांच्या घसरणीसह १९,०४२ अंकांवर बंद झाला.
आज बाजारात सर्व आघाडीच्या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाली. बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, एनर्जी या क्षेत्रातील शेअर घसरले. केवळ धातू, रिअल इस्टेट आणि मीडिया क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली. मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्स देखील वेगाने बंद झाले.