सरनोबतवाडीत आयशर टेम्पोला शॉर्टसर्किटने आग : दहा लाखांचे नुकसान

0
72

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणाऱ्या ट्रक रिपेरी गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटने आयशर टेम्पोला आग लागली. यामध्ये या ट्रकचे सुमारे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सरनोबतवाडी येथे शामराव माने यांचे श्रीगणेश ट्रक रिपेअरीचे गॅरेज आहे. आज (बुधवार) दुपारच्या सुमारास त्याठिकाणी कामाना देवकाते (रा. पसरिचानगर, उजळाईवाडी) यांचा ट्रक क्र. (एमएच ०९- ८२०४) हा बॉडी बांधण्यासाठी आणला होता. यावेळी शॉर्टसर्किटने आग लागून यामध्ये ट्रकचे दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले. तर गॅरेजमधील साहित्यांचे नुकसान झाले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.