मुंबई (प्रतिनिधी) : भारतातल्या ग्रामीण भागात कुक्कुटपालन हा जोडधंदा आहे. अनेक शेतकरी शेतीसोबत कोंबड्या पाळतात, तर अनेक जण पोल्ट्रीफार्म सुरू करून हा व्यवसाय करतात. त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवतात; पण असाच आणखी एक पक्षी आहे, ज्याची अंडी कोंबडीच्या अंड्यांपेक्षा महाग आहेत. त्या पक्ष्याला पाळण्यासाठी परवाना असावा लागते.

ग्रामीण भागात आणि जंगलात कवडा नावाचा एक पक्षी आढळतो. या पक्ष्याला हिंदीत ‘तितर’ असे म्हणतात. हा पक्षी वर्षभरात जवळपास ३०० अंडी घालतो. कवडापालन करून कुक्कुटपालनापेक्षा जास्त नफा मिळवता येतो. हा पक्षी जन्मानंतर ते ५० दिवसांत अंडी घालण्यास सुरुवात करतो. त्याचा व्यवसाय फार कमी वेळात सुरू करता येतो. सरकार शेतकऱ्यांना हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदतही करते. असे केल्याने ‘कवडा’ पक्ष्यांची संख्याही वाढेल आणि शेतकऱ्यांना नफाही मिळेल.