कळे (प्रतिनिधी) : धामणीखोऱ्यात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या भागाची पाहणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि कुंभी कासारी बचावमंचचे अध्यक्ष बाजीराव खाडे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची त्यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे पणुत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाची वाडी,पात्रेवाडी, चौधरवाडी, धुंदवडे येथील डोंगराचे भूस्खलन होऊन शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. यावेळी खाडे यांनी या भागांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीचा योग्य प्रकारे पंचनामा करून अहवाल कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवण्याबाबत सांगितले.

यावेळी कृषी अधिकारी कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र धायगुडे, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, सतीश मोळे, हरपवडचे सरपंच दिनकर चौगले, पणुत्रे सरपंच प्रकाश पाटील, ग्रामस्थ उपस्थित होते.