उद्योग क्षेत्रास अखंडित वीज पुरवठ्यासाठी प्रयत्नशील : मासाळ

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणसमवेत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (स्मॅक) च्या पदाधिकारी व उद्योजकांची वीज विषयक अडीअडचणीबाबत चर्चा झाली. उद्योजकांनी वारंवार वीज खंडित होत असल्याची तक्रार मांडली. त्यावर उद्योगांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याबाबत महावितरणकडून कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ यांनी आश्वस्त केले.

शिरोलीतील उद्योजक ग्राहक, संघटना प्रतिनिधी व महावितरण अधिकारी यांच्यात थेट व जलद संवाद व्हावा, यासाठी फिडरनिहाय २२ व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या बैठकीत शिरोली औद्योगिक क्षेत्रातील पदोन्नतीने रिक्त शाखा अभियंता पदावर लवकरच पूर्णवेळ नियुक्ती देण्यात येईल, असे मासाळ यांनी स्पष्ट केले. बैठकीस महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संपत गावडे, विलास शिर्के, उप कार्यकारी अभियंता मुकुंद आंबी, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  कोल्हापूर (स्मॅक) चे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष एम. वाय. पाटील, स्मॅक आयटीआय चेअरमन राजू पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग अँड फाउंड्री क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, संचालक प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, निमंत्रित सदस्य नामदेव पाटील,  अविनाश चिकणीस यांच्यासह  उद्योजक, विविध कंपन्यांचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.