कोल्हापुरात शनिवारी शिक्षण जागर पुरस्कार वितरण सोहळा…

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीतर्फे आयोजन

0
93

कोल्हापूर (प्रतिनिधी) : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शनिवार दि. १६ जानेवारी रोजी दुपारी २ वा. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे शिक्षण जागर पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या जिल्ह्यातील २० शिक्षकांना शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी आ. चंद्रकांत जाधव,  आ. ऋतुराज पाटील, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर,  माजी उपमहापौर संजय मोहिते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या वेळी राज्य संपर्कप्रमुख आनंदा हिरुगडे, सचिव शिवाजी भोसले, नंदिनी पाटील, महादेव डवरे, अनिल सरक, सविता गिरी, आदिती केळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.