टोप (प्रतिनिधी) : टोप ग्रामपंचायतीतर्फे गावात ठिकठिकाणी पर्यावरणपुरक मुर्तीदानाचा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, हातकणंगले सभापती डॉ. प्रदिप पाटील, महिला बालविकास अधिकारी सुजाता शिंदे यांच्या हस्ते आरती करुन मुर्तीदानास सुरुवात करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपच्या ग्रामपंचायतीने पर्यावरणपूरक गौरी, गणपती विसर्जनाची सोय ठिकठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये मारुती मंदीर, माळवाडी आणि नवासोबती चौक या तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केले असून या ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवण्यात आले आहेत. यावेळी मुर्ती निर्माल्य दानास चांगला प्रतिसाद मिळाला. विर्सजनासाठी या ठिकाणी मोठ्या कृत्रिम कुंडात पाण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत नागरीक प्रशासनाला सहकार्य करतानाचे चित्र दिसून आले.