इचलकरंजी (प्रतिनिधी) : खा. धैर्यशील माने यांनी आज (बुधवार) नांदणी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांची यांची भेट घेत प्रत्येक गावच्या विकास कामांची माहिती घेतली. तसेच नांदणी येथील झालेल्या आढावा बैठकीमध्ये ग्रामविकास अधिकारी, महावितरणचे अधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी विविध समस्या खासदारांच्या समोर मांडल्या. यावेळी माने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या. तसेच गावकऱ्यांनी मांडलेल्या पाणी, पुनर्वसनासाठी दिलेल्या जमिनी, पाणंद रस्ते, शेती, क्षारपड जमीन तसेच पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत समस्या विषयी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तसेच गावच्या इदगाहसाठी दहा लाख आणि हनुमान मंदिरासाठी क वर्गमधून दहा लाखांचा निधी मंजूर केला.

या बैठकीत सरपंच संगीता तगारे आणि उपसरपंच डॉ. सागर पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तर गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी निःपक्षपातीपणे काम करूया, असे मत उपसरपंच डॉ. सागर पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी पं.स.चे माजी सभापती मीनाक्षी कुरडे, संजय बोरगावे, आप्पा नाईक, युनूस पटेल, अमित नलवडे, अनिल क्षीरसागर, बाबुराव ऐनापुरे काशिनाथ चव्हाण, दिनेश बुबने, अझरुद्दीन शेख, ग्रामस्थ उपस्थित होते.