कोल्हापूर (प्रतिनिधी) : खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेतंर्गत कोल्हापूरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे ऍ़स्ट्रो टर्फयुक्त मैदान, सुविधा आणि विकसित करण्याचे काम नियुक्त ठेकेदारामार्फत सुरु आहे. आज (शुक्रवार) या मैदानाची पाहणी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केली.

यावेळी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी हे काम काम दर्जेदार व उत्तम दर्जाचे करण्यासाठीच्या सुचना संबंधीतांना दिल्या. तर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी खेळाडूंसाठी नियोजित वस्तीगृहाचा प्लॅन आणि त्यासाठी आवश्यक असणारा निधी प्राप्त होण्यासाठी शासनाच्या क्रिडा विभागाला प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना शहर अभियंत्यांना दिल्या.

यावेळी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जिल्हा क्रिडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर साखरे, कनिष्ठ अभियंता (प्रकल्प) अनुराधा वांडरे, जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुमार आगळकर, हॉकी प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.