मुंबई (प्रतिनिधी) :  राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार २१ जुलै २०१६ आणि ५ ऑगस्ट २०१६ अन्वये ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार प्रादेशिक परिवहन यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हेल्मेट नसल्यास दुचाकीस्वारांना आता पेट्रोल मिळणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी सर्व पेट्रोलपंपमालकांना आदेश दिले आहेत की, हेल्मेट घालून आलेल्यांनाच पेट्रोल द्यावे, हेल्मेट नसेल तर त्यांना देऊ नये. सध्या हे धोरण फक्त शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीसाठी लागू केले आहे. याकरिता पोलिस आयुक्तांनी अधिसूचना काढली आहे. विनाहेल्मेट चालकाला पेट्रोल दिल्यास अशा दुचाकीस्वाराचा नमुना फार्म प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सुरुवातीचे १५ दिवस पोलिसांकडून पेट्रोलपंपावर बंदोबस्त ठेवला जाणार आहे.  पंपावर सीसीटीव्ही लावण्याचे आदेशही देण्यात आले असून त्याचे रेकॉर्डिंग ४५ दिवस जतन करावे. लागणार आहे.