‘त्या’ पोस्टमुळे अभिनेते किरण मानेंना मालिकेतून काढले

0
46

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेते किरण माने यांना ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानकपणे काढून टाकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर माने यांच्या समर्थनार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुढे आली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने यांना मालिकेमधून काढले गेले, म्हणून निषेध व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर किरण माने यांनी ‘आम्ही दोन प्रेक्षक असले तरी प्रयोग करतो’, अशी एक पोस्ट केली होती. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले. स्टार प्रवाहच्या पेजवर कॅम्पेन चालवत त्यांना सिरियलमधून काढून टाकण्यात यावे. त्यानंतर  मालिकेतून काढण्यात आल्याचे माने यांनी सांगितले.

किरण माने म्हणाले की, महाराष्ट्रात अशी झुंडशाही खपवून घेतली जाऊ नये. माझ्या उदाहरणामधून काय घडणार आहे, हे आपण पाहूयात. यात जर मला न्याय मिळाला नाही तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही.  माझ्या इतर पोस्ट वाचा, त्यामध्ये कुठेही जातीवादी किंवा टीका दिसणार नाही.  मी बळी पडलो. पण ठिक आहे, मी यातून उभा राहिन. मी खंबीर आहे. हा माझा अभिनय क्षेत्रातला झालेला खून आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.