जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली : ‘राधानगरी’तून १३५० क्युसेकने विसर्ग

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील राधानगरी धरणात १३१.४४ दलघमी पाणीसाठा आहे. आज (मंगळवार) सकाळी च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन विमोचकातून १३५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,  भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडग कोगे, कासारी नदीवरील-यवलूज, वेदगंगा नदीवरील- वाघापूर व निळपण, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण १५ बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा पुढीलप्रमाणे (द.ल.घ.मी.मध्ये)

तुळशी  – 56.63, वारणा – 711.85, दूधगंगा – 355.37, कासारी – 54.46, कडवी -38.76, कुंभी – 55.81, पाटगाव – 72.12,  चिकोत्रा – 25.51, चित्री – 37.37, जंगमहट्टी – 16.52, घटप्रभा – 44.17, जांबरे – 23.23, आंबेआहोळ – 19.11, कोदे (ल.पा.) पूर्ण क्षमतेने भरला आहे.

बंधाऱ्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे (फुटांमध्ये) – :

राजाराम 26.8, सुर्वे – 25.4, रुई – 55, इचलकरंजी – 51.6, तेरवाड – 46.6, शिरोळ – 35, नृसिंहवाडी – 31.4, राजापूर – 20.6,  सांगली – 8.3, अंकली – 9.6.