मुंबईतील सायनमध्ये २१ कोटींचे ड्रग्ज जप्त : महिलेला अटक

0
37

मुंबई (प्रतिनिधी) :  मुंबईतील सायनमधून २१ कोटींचं ७ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे मुंबई ड्रग्स माफियांचा अड्डा बनत चालल्याची चर्चा होत आहेत. 

मुंबई क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ससोबतच एका महिला ड्रग्स सप्लायरला अटक केली आहे. मुंबईसह राजस्थानमध्ये अंमली पदार्थाचं मोठं रॅकेट असल्याचं उघड झालं आहे. आर्यन खान प्रकरणासोबतच आता हा ड्रग्सचा साठा चर्चेत आला आहे.