गडहिंग्लजमध्ये वाहनचालकांची जागृती मोहीम

0
461

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ड्रायव्हिंग लायसन्स, इन्शुरन्स तसेच वाहनांची कागदपत्रे नसताना वाहन चालविणे, वाहतुकीचे नियम मोडणे आदींबाबत वाहनचालकांमध्ये जागृती करण्याची मोहीम गडहिंग्लजमध्ये सुरू झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या सूचनेनुसार ‘सध्या फक्त सूचना आणि नंतर कायदेशीर कारवाई’ असा पोलिसांचा अजेंडा आहे.

आज (रविवार) दुपारी चंदगड मार्गावर दुचाकी वाहनधारकांना अडवून पोलिसांनी सूचना दिल्या. वाहन चालविताना मोबाईलवर बोलत अथवा हेडफोन लावून गाणी ऐकत अपघाताला आमंत्रण देऊ नका, अल्पवयीन मुलांच्या ताब्यात वाहन देऊ नका, वाहनाला दोन्ही बाजूस आरसे,  इंडिकेटर आदी बसवून घ्या, फॅन्सी नंबरप्लेट वापरू नका, आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवू नका, अशा सूचना देत १२  तारखेनंतर अशा वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचेही पोलिसांनी यावेळी वाहनधारकांना सांगितले. युवराज पाटील,  तानाजी पाटील, बाबासाहेब सावंत,  रेश्मा क्षीरसागर,  धनश्री सावंत आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबविली.