पाडळीच्या सरपंचपदी डॉ. विभा पाटील तर उपसरपंचपदी रविंद्र पाटील बिनविरोध   

0
171

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील दरवेश पाडळीच्या सरपंचपदी डॉ. विभा दिपक पाटील यांची तर उपसरपंचपदी रविंद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

विहित वेळेत घोगराई ग्रामविकास पॅनलकडून डॉ. विभा पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी तर रवींद्र वसंत पाटील यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हातकणंगले ग्रामीण पाणी पुरवठा संस्थेचे इंद्रजीत मांडेकर यांनी तर तलाठी अजय नाईक, ग्रामसेवक अनिल भारमल यांनी सचिव म्हणून काम पाहिले.

या वेळी प्रकाश पाटील, विनोद पाटील, निवृत्ती वाघमोडे, सुजाता पाटील, शिवाजी पाटील, ऐश्वर्या पाटील, भाग्यश्री गायकवाड, श्रीधर पाटील, उषा दाभाडे, कोंडिबा पोवार, नूरजहान शेख-पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.